आयपीएलच्या यंदाच्या हंगामात साई सुदर्शन याने ७५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खास क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे.
इथं एक नजर टाकुयात साई सुदर्शनसह आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने आयपीएल २०२५ च्या हंगामात १५ सामन्यात ७६० धावा केल्या. या कामगिरीसह तो एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये पोहचला आहे.
डेविड वॉर्नर हा देखील या यादीत आहे. ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाजाने सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना २०१६ च्या हंगामात ८४८ धावा केल्या होत्या.
इंग्लंडचा स्टार बॅटर जोस बटलर हा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून ८६३ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
शुबमन गिलने २०२३ चा हंगाम गाजवला होता. गुजरात टायटन्सकडून त्याने या हंगामात ८९० धावा काढल्या होत्या.
विराट कोहलीनं २०१६ च्या हंगामात आरसीबीकडून ९७३ धावा केल्या होत्या. त्याचा हा रेकॉर्ड मागील नऊ हंगामापासून कायम असू या हंगामातही त्या विक्रमाला कोणी धक्का लावू शकत नाही.