मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. दरम्यान, आता सारा तेंडुलकरचे मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सारा तेंडुलकर ही नुकतीच कुटुंबातील निकटवर्तीयांच्या विवाह सोहळ्यात गेली होती. तिथे सारा तेंडुलकरने पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहराव केला होता. साडी, नथ, गरजा अशा पेहरावात ती खूप सुंदर दिसत होता.
एरवी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्या साराचा हा मराठमोळा साज पाहून पाहणारे अवाक झाले. त्यामुळे तिचे हे फोटे सोशल मीडियावर पसंद केले जात आहेत. तिने हातात कलश घेतल्याने ती लग्नात करवली म्हणून गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
साराचे साडीमधील फोटो हे पहिल्यांदाच समोर आल्याने त्यांचं कौतुक होत आहे. सारासोबतच तिचं संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्यात सहभागी झालं होतं.
मुख्य सोहळ्यासाठी साडी नेसणाऱ्या सारानं उर्वरित कार्यक्रमात पांढरा ड्रेस घातला होता. त्यातही ती सुंदर दिसत आहे.
जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच तेंडुलकर कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
दरम्यान, तेंडुलकर कुटुंबाचा हा मराठमोळा साज सोशल मीडियावर पसंत केला जात आहे.