Sachin Tendulkar Jim Corbett National Park: उत्तराखंडच्या नैनितालमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. निसर्गाचे हे साजिरे रुप पाहण्याचा मोह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आवरला नाही.
सचिनने आपल्या कुटुंबासह जिम कॉर्बेट पार्कला भेट दिली. येथे त्याला बंगाल टायगर दिसला. सचिन तेंडुलकरसोबत त्याची पत्नी आणि मुलगी सारा तेंडुलकर देखील आली होती.
सचिन तेंडुलकरने कॉर्बेट नॅशनल पार्क गाठून जंगल सफारी केली आणि ढिकला येथे रात्रीचा मुक्काम केला. ढिकळा हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
दुसऱ्या दिवशी, सचिन आपल्या कुटुंबासह जंगल सफारीसाठी गेला, तिथे त्याला कॉर्बेट पार्कच्या अधिकाऱ्यांसह वाघ दिसला. सचिनने कॉर्बेट पार्कमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली.
सचिनने मार्च महिन्याच्या अखेरीस जिम कॉर्बेट पार्कची सफारी केली होती. त्यापैकी काही खास फोटो त्याने गुरुवारी, ९ मे रोजी पोस्ट केले आणि त्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. इन्स्टाग्राम पोस्टसोबत त्याने #Throwback हॅशटॅगही वापरला आहे.