मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच प्री-वेडिंग सोहळा जामनगर येथे थाटात साजरा झाला.
सचिन, पत्नी अंजली, मुलगी सारा यांच्यासह दोन्ही कुटुंबातील महत्त्वाची मंडळी या सोहळ्याला उपस्थित असल्याचे दिसले.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, आकाश व अनंत अंबानी आणि संपूर्ण अंबानी परिवार सोहळ्याला हजर होता.
या सोहळ्यादरम्यान साऱ्यांनाच तेंडुलकर कुटुंबाच्या होणाऱ्या सुनबाईची सुंदर, सुशील अन् घरंदाज झलक पाहायला मिळाली.
सचिनची होणारी सूनबाई सानिया चंडोक ही प्रसिद्ध खाद्यसमुह उद्योगपती 'ग्रेविस ग्रुप'चे प्रमुख रवी घई यांची नात आहे.
सानिया ही स्वत: एक यशस्वी लघुउद्योजिका असून ती मुंबईतील 'मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी'ची संचालक आहे.
अर्जुन-सानिया सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी सानियाचे स्मितहास्य सर्वांनाच भावले.
अर्जुन आणि सानिया यांचा नुकताच एक प्री वेडिंग सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये सानिया खूपच सुंदर दिसत होती.
अर्जुन-सानिया एकमेकांवर खूप प्रेम करतात, आमच्या मुलाच्या निवडीवर आम्हाला अभिमान आहे, असे सचिन म्हणाला.
सानिया आणि अर्जुन तेंडुलकर हे बालपणीचे मित्र आहेत. तिने कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.