सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी हिच्यासोबत झाला. मुंबईमध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मोजक्या निमंत्रितांमध्ये हा सोहळा पार पडला.
साखरपुड्याची बातमी येताच सचिनची होणारी सून कशी दिसते, अर्जुनसोबतचे तिचे फोटो अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरु आहे. पाहा, सानिया चांडोकचे असे ५ फोटो, जे तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच पाहिलेले नसतील.
हा फोटो खूपच खास आहे. यात अर्जुन तेंडुलकरसोबत त्याची होणारी बायको सानिया चांडोकदेखील बसली आहे. सानिया मुंबईत एक आलिशान पाळीव प्राण्यांचे सलून चालवते. दोघेही कुत्र्याच्या पिल्लाशी खेळताना दिसत आहेत.
अर्जुन तेंडुलकर IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो, त्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईची जर्सी घालून सानिया चांडोक अनेकदा स्टेडियममध्ये हजर राहिली आहे. सारा तेंडुलकरच्या सोबतच सानिया अनेकदा दिसली आहे.
या फोटोमध्ये सानिया चांडोक आणि सारा तेंडुलकर दोघीही दिसत आहेत. अर्जुनची होणारी बायको सानिया ही साराची खूपच चांगली आणि जवळची मैत्रीण आहे. त्या दोघींनी अनेक ट्रिप्स केल्या असून एकत्र फिरताना दिसल्या आहेत.
सानिया चांडोक आणि सारा तेंडुलकर यांच्यात घट्ट मैत्री आहे. त्यामुळेच सानिया आणि अर्जुन या दोघांची सतत भेट होत असायची. सर्वात आधी सारानेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती, असे सांगितले जाते.
सारा तेंडुलकरने नुकतेच मुंबईच्या अंधेरी परिसरात पिलेट्स अकॅडमी सुरु केली. त्याचे फोहीटो तिने सोशल मीडियावर टाकले. त्यात तेंडुलकरांची होणारी सून सानिया चांडोक हिची साखरपुड्यानंतरची पहिली झलक दिसली.