Join us  

नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020

By स्वदेश घाणेकर | Published: November 09, 2020 7:30 AM

Open in App
1 / 9

डॅडी आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान सर्वात आधी संपुष्टात आले. IPL इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला. त्याच्या संघातील ऋतुराज गायकवाडनं स्पार्क दाखवताना CSKचं भविष्य उज्ज्वल असल्याचे सिद्ध केलं.

2 / 9

कोरोनावर मात करून मैदानावर उतरलेला ऋतुराज सुरुवातीला अडखळला, परंतु साखळी सामन्यात अखेरच्या तीन सामन्यांत त्यानं अर्धशतकी खेळी करून सर्वांना प्रभावित केलं. चेन्नईसाठी सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्यानं 6 सामन्यांत 204 धावा केल्या.

3 / 9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आतापर्यंत चिंतेचा विषय ठरलेला सलामीचा प्रश्नच देवदत्त पडीक्कलनं सोडवला. आक्रमक व बिनधास्त खेळी करून देवदत्तनं संघातील त्याची जागा पुढील आयपीएलमध्येही कायम ठेवली आहे. देवदत्तनं 15 सामन्यांत 473 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ( 8 विकेट्स) याच्या इकॉनॉमीची चर्चा कायम राहिली.

4 / 9

किंग्स इलेव्हन पंजाबच्या रवी बिश्नोईनं आपल्या फिरकीच्या तालावर सर्वांना नाचवले. अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवीनं अनेक बारकावे शिकले आणि ते प्रत्यक्ष अमलातही आणले. त्यानं 14 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या. पंजाबच्या अर्शदीप सिंग ( 9 विकेट्स) आणि मनदीप सिंग ( 130 धावा) यांनीही लक्षवेधक कामगिरी केली.

5 / 9

राजस्थान रॉयल्स नेहमी युवा जोशवर भरवसा ठेवणारा संघ. यंदाही त्यांनी परंपरा कायम राखली. त्यामुळेच राहुल टेवाटियासारखा मॅच फिनिशर खेळाडू त्यांना सापडला. कार्तिक त्यागी ( 9 विकेट्स) या युवा जलदगती गोलंदाजानं सर्वांना थक्क केलं. टेवाटियानं 255 धावा चोपल्या, शिवाय 10 विकेट्सही घेतल्या.

6 / 9

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात तुषार देशपांडे या नव्या नावाचीही चर्चा रंगली. त्यानं 5 सामन्यांत 3 विकेट्स घेतल्या.

7 / 9

मुंबई इंडियन्सचा संघ म्हटला की तगड्या खेळाडूंची फौजच... रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, हार्दिक व कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह असे महारथी या संघात आहेत. पण, यंदा इशान किशन यानं सर्वांची वाहवाह मिळवली. त्यानं 13 सामन्यांत 483 धावा केल्या.

8 / 9

टी नटराजन हे नाव कुणी विसरणार नाही. सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजाचा प्रवास प्रेरणादायी आहे. गरीब कुटुंबातील या गोलंदाजानं यंदाची आयपीएल गाजवली. 16 विकेट्स घेणाऱ्या नटराजननं सर्वाधिक 66 यॉर्कर यंदाच्या आयपीएलमध्ये फेकले. एबी डिविलियर्स, महेंद्रसिंग धोनी या ड्रीम विकेट्स त्यानं घेतल्या.

9 / 9

कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात युवा खेळाडूंचा भरणाच होता. शुबमन गिल ( 440), शिवम मावी ( 9 विकेट्स), कमलेश नागरकोटी ( 5 विकेट्स), वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी ( 230 धावा) यांनी IPLच्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर केला. यापैकी वरुण चक्रवर्थीची यंदा लॉटरी लागली आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ट्वेंटी-20 संघाचे तिकिट मिळाले. चक्रवर्थीनं 13 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या. 5 बाद 20 धावा ही त्याची यंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सकिंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स