Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:15 IST

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलिया दौरा संपून अनेक दिवस झाले. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. कसोटी, टी२०मधून निवृत्त झाल्यामुळे हे दोघे आता केवळ वनडेमध्येच खेळतात.

2 / 6

विराट आणि रोहित यांना संघातून वगळण्याच्या किंवा त्यांच्या निवृत्तीच्या अनेक चर्चा रंगलेल्या आहेत. दोघांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी केली पण तरीही आगामी काळातील त्यांच्या समावेशाबाबत अनिश्चिता दिसते आहे.

3 / 6

यादरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता विराट आणि रोहित या दोघांसाठीही एक अट घातली आहे. या दोघांनाही भविष्यात टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर त्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.

4 / 6

विराट आणि रोहित सध्या मैदानापासून दूर आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी वनडे मालिका खेळली. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत आधी कसोटी आणि नंतर वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेआधी बीसीसीआयने अट ठेवली आहे.

5 / 6

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, भारतीय बोर्डाने दोघांनाही देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये सहभाग घेण्यास सांगितले आहे. ही स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर आफ्रिका मालिका ३० तारखेपासून आहे.

6 / 6

अहवालात म्हटले आहे की रोहितने मुंबई क्रिकेट असोसिएशनला स्पष्टपणे कळवले आहे की तो विजय हजारे स्पर्धा खेळले. तसेच तो सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतही दिसू शकतो. मात्र विराट कोहलीने याबाबत अद्याप उत्तर दिलेले नाही.

टॅग्स :बीसीसीआयरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड