Rohit Sharma lifestyle : Mumbai Indians चा 'हिटमॅन' बनला टीम इंडियाचा नवा बॉस! २०० कोटींची नेटवर्थ, दीड कोटींची BMW कार अन् बरंच काही...

रोहितला महागड्या कारची आवड आहे. त्याच्याकडे दीड कोटीच्या BMW सह अनेक आलिशान कार्स आहेत.

Rohit Sharma lifestyle : Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्मा याला टी२० आणि वन डे संघानंतर शनिवारी भारताच्या कसोटी संघाचेही कर्णधारपद (Test Captain) मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी२० आणि दोन कसोटी सामन्यांसाठी आज संघाची घोषणा केली. त्यामुळे आता रोहित शर्मा टीम इंडियाचा 'नवा बॉस' झाला आहे.

वन डे क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे. रोहितने सर्वोत्तम २६४ धावांची खेळी २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच खेळली होती. तो एक जागतिक विक्रम आहे.

रोहित शर्मा आपल्या मैदानातील आणि मैदानाबाहेरील अशा दोन्ही पद्धतीच्या जीवनशैलीमुळे लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

सध्या रोहित शर्माची संपत्ती २०० कोटींहून अधिक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ पर्यंत रोहितची एकूण संपत्ती सुमारे १६० कोटी इतकी होती. रोहितला IPL मधील मुंबई इंडियन्सने १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे.

रोहितला पहिल्यापासूनच महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याने अनेक व्हिडिओ, फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्याकडे BMW 5M सिरीजची कार आहे. त्याची किंमत सुमारे १.६० कोटींहून अधिक आहे. त्याशिवाय रोहितकडे मर्सिडीज, ऑडी, स्कोडा लॉरा, टोयोटा फॉर्च्युनर आणि इतर काही कार आहेत.

रोहित शर्माचा मुंबईतील वरळी येथे एक आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट आहुजा टॉवर इमारतीच्या २९व्या मजल्यावर आहे. या घराची किंमत ३० कोटी इतकी आहे. या फ्लॅटमधून थेट अरबी समुद्र दिसतो. हा फ्लॅट ६ हजार स्क्वेअर फूट इतका मोठा आहे.

रोहित शर्माचे अफेअर इंग्लिश मॉडेल सोफिया हयात सोबतही असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना पूर्णविराम लावत रोहितने रितिका सजदेह हिच्याशी १३ डिसेंबर २०१५ साली लग्न केलं. त्यांना समायरा नावाची एक गोड मुलगीदेखील आहे.

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सर्वाधिक पाच वेळा IPL स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले आहे. यावेळीही रोहित मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं आहे.

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम आणि ट्वीटर