बाप-लेकीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा वेगळंच असतं. वडील हा मुलीचा पहिला 'बेस्ट फ्रेंड' असतो.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची मोठी लेक समायरा यांचं नातंही तसंच आहे.
रोहितने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर तो मालदीवध्ये सुटी एन्जॉय करतोय.
मालदीवमध्ये रोहित आपली लेक समायरा हिच्याबरोबर धमाल मजा मस्ती करताना दिसतोय.
स्विमिंग असो की वाळूत खेळणं असो, बाप-लेकीच टीम फुल ऑन एन्जॉय करताना दिसतेय.
रोहितने आपल्या मालदीव व्हेकेशनमधील लेकीसोबतचे काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत.
रोहित शर्माचा IPL आधीचा 'कूल' अंदाज अन् खास स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.