Join us

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची लिलावात असेल 'या' ५ खेळाडूंवर नजर; लागणार कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:08 IST

Open in App
1 / 6

Mumbai Indians Rohit Sharma IPL 2024 Auction: मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतले तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केले. आता १७.२५ कोटींची रक्कम हाती असताना रोहित शर्माचा मुंबई संघ ५ मॅचविनर खेळाडूंवर नजर ठेवून त्यांना विकत घेण्यासाठी कोटींची बोली लावू शकतो.

2 / 6

Gerald Coetzee: दक्षिण आफ्रिकेचा नवखा गोलंदाज गेराल्ड कोइत्झी हा २ कोटींच्या मूळ किमतीसह रिंगणात आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये त्याने ८ सामन्यात तब्बल २० बळी टिपले. जसप्रीत बुमराहच्या सोबत ओपनिंग बॉलिंग पार्टनर म्हणून मुंबई इंडियन्ससाठी कोएत्झी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

3 / 6

Mujeeb Ur Rahman: अफगाणिस्तानचा 'मिस्ट्री स्पिनर' मुजीब उर रहमान हा देखील मुंबईसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या वन डे वर्ल्ड कप मध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच, IPL मध्ये त्याने आतापर्यंत १९ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या असून तो नव्या चेंडूनेही गोलंदाजी करण्यात सक्षम पर्याय आहे.

4 / 6

Wanindu Hasaranga: श्रीलंकेचा स्पिनर वानिंदू हसरंगा याला RCB ने रिलीज केले आहे. मुंबई इंडियन्सदेखील एका चांगल्या स्पिनरच्या शोधात आहे. हसरंगाने आतापर्यंत IPL मध्ये २६ सामन्यांमध्ये ३५ विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावलाचे वय पाहता आता मुंबई हसरंगाला संघात घेण्याचा डाव खेळू शकते.

5 / 6

Pat Cummins: ऑस्ट्रेलियाचा टी२० कर्णधार पॅट कमिन्स हा देखील मुंबई इंडियन्सच्या रडारवर आहे. त्याने आतापर्यंत ४२ सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाताने त्याला गेल्या IPL मध्ये ७.२५ कोटींनी विकत घेतले आहे.

6 / 6

Mitchell Starc: ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा अतिशय घातक वेगवान गोलंदाज आहे. स्टार्कने २०१४-१५ मध्ये RCB आणि २०१८ मध्ये कोलकाताचे प्रतिनिधित्व करत २७ सामन्यात एकूण ३४ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरच्या जागी स्टार्क संघात आल्यास मुंबईला नक्कीच फायद्याचे ठरेल.

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सरोहित शर्माजसप्रित बुमराह