Join us

रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:33 IST

Open in App
1 / 6

कसोटी व टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याचा क्रिकेटप्रवास संपू शकतो असे दावे केले जात आहेत.

2 / 6

या दौऱ्यासाठी त्याची निवड होण्यापूर्वी, फिटनेसचा प्रश्न येत राहिला आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा बेंगळुरूला पोहोचला आणि त्याने आवश्यक ती फिटनेस चाचणी दिली.

3 / 6

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर, रोहित शर्मा फिटनेस चाचणीसाठी बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचला. येथे शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस सर्व खेळाडूंची चाचणी घेण्यात आली.

4 / 6

बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंची फिटनेस तपासण्यासाठी यो-यो चाचणीसह ब्राँको चाचणीचा समावेश केला. त्यापैकी रोहितसह अन्य खेळाडूंची यो-यो चाचणी झाली, पण ब्राँको टेस्ट झाली की नाही याची माहिती आलेली नाही.

5 / 6

रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, रविवारी, ३१ ऑगस्टला रोहित शर्मासह सर्व खेळाडूंनी यो-यो टेस्ट दिली. IPL 2025 नंतर रोहित ३ महिने क्रिकेटपासून दूर आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेस चाचणीच्या निकालावर साऱ्यांचे लक्ष होते.

6 / 6

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की स्टार फलंदाज रोहितने कोणत्याही समस्येशिवाय फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. इतकेच नाही तर चाचणी पूर्ण करून मुंबईत परतलेला रोहित शर्मा अगदी तंदुरुस्त दिसत होता.

टॅग्स :रोहित शर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया