Rohit Sharma Birthday, Wife Ritika: Mumbai indians चा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. रोहितच्या वाट्याला गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानावर फारचे आनंदाचे क्षण आलेले नाहीत.
रोहितच्या वाढदिवशी त्याची पत्नी रितिका सजदेह हिने मात्र त्याला खास शुभेच्छा दिल्या. तिने त्याच्यासोबतचे पाच खास फोटो पोस्ट करत सदिच्छा व्यक्त केल्या.
रितिकाने आपल्या शुभेच्छांमध्ये 'हकुना मटाटा' असे शब्द वापरले. रोहितचा क्रिकेटच्या मैदानावरील वाईट काळ लवकर संपावा अशी इच्छा तिने व्यक्त केली. पण त्यापेक्षा दुसऱ्या एका व्यक्तीच्या फोटोवर तिने केलेली कमेंट जास्त चर्चेत ठरली.
मुंबई इंडियन्ससोबतच टीम इंडियाचाही कर्णधार असलेल्या रोहित शर्माला सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. याच शुभेच्छांमध्ये एका व्यक्तिने रोहितबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता.
त्या फोटोवरून रितिका काहीशी नाराज झाली. तिच्यापेक्षाही रोहितचा त्या व्यक्तीसोबतचा फोटो अधिक रोमँटिक असल्याचं ती म्हणाली. पाहूया कोण आहे ती व्यक्ती आणि तो फोटो आहे तरी कोणता...
ती व्यक्ती म्हणजे रोहितचा टीम इंडियातील सहकारी युजवेंद्र चहल. त्याने रोहितचा एक फोटो पोस्ट केला. त्यात रोहित त्याला एक फुल देताना दिसतोय. त्यावर रितिकाने कमेंट केली, 'शेवटचा फोटो पाहून मला तुझा राग येतोय, आमच्यापेक्षा तुझा अन् रोहितचा फोटो जास्त रोमँटिक आहेत.'
रितिकाची ती कमेंट नक्कीच मजेशीर आणि मस्करीत केलेली होती. दरम्यान, रोहितचा वाढदिवस मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्येही शानदार पद्धतीने साजरा झाला.