Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Sharma and Ritika Sajdeh: 'माझ्या बहिणीपासून दूर राहा...' रोहित शर्माला 'या' दिग्गज खेळाडूने दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:01 IST

Open in App
1 / 7

Rohit Sharma and Ritika Sajdeh: भारतीय क्रिकेटपटूंच्या मैदानावरील किस्स्यांसह त्यांच्या लव्ह स्टोरीदेखील प्रसिद्ध आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेमकहाणीही खूप मजेशीर आहे. रोहितने आपल्या एका सीनिअर सहकाऱ्याच्या बहिणीशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे, या सीनिअरने पहिल्या भेटीत रोहित शर्माला बहिणीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. पण, रोहित मागे हटला नाही अखेर रितिकासोबत लग्न केले.

2 / 7

रोहित शर्माचा हा सीनियर दुसरा-तिसरा कोणी नसून युवराज सिंग आहे. रोहित शर्माला युवराज सिंगने बहिणीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन' चॅट शोमध्ये स्वतः रोहित शर्माने याचा खुलासा केला आहे. रितिका स्पोर्ट्स मॅनेजर होती. तिने अनेक क्रिकेटपटूंचे व्यवस्थापन पाहिले, त्यापैकी एक होता रोहित शर्मा होता. रोहित शर्मा पहिल्यांदा रितिका सजदेहला भेटला तेव्हा त्याला रितिका खूप उद्धट वाटत होती.

3 / 7

रोहित शर्माने मुलाखतीत सांगितले की, मी टीम इंडियाच्या काही वरिष्ठ खेळाडूंसोबत शूट करत होतो. युवराज सिंगही त्या शूटचा एक भाग होता. मी युवराज सिंगला भेटलो तेव्हा रितिकाही तिथे होती. मी युवी पाजीला हॅलो म्हणालो, तेव्हा युवराज सिंगने मला स्पष्टपणे सांगितले की रितिका माझी बहीण आहे आणि तू तिच्याकडे पाहू नकोस, तिच्यापासून दूर राहा.

4 / 7

रितिका युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. रितिका युवराज सिंगला राखी बांधते. युवराज सिंगच्या इशाऱ्यानंतर रोहित शर्माने रितिका सजदेहकडे रागाने पाहिले आणि विचार केला ती कोण आहे? ती एवढा अॅटीट्युड का दाखवत आहे? नंतर त्याच शूट दरम्यान रोहित रितिकाशी बोलला आणि त्यांची मैत्री झाली.

5 / 7

युवराज सिंगच्या इशाऱ्यानंतरही रोहित शर्माने हळूहळू रितिका सजदेहशी मैत्री केली. यानंतर दोघांमध्ये डेटिंग सुरू झाली. दोघेही जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. 6 वर्षांच्या डेटिंगनंतर रोहित शर्माने रितिकाला प्रपोज केले. रोहितने रितिकाला अशा ठिकाणी प्रपोज केले, ज्या ठिकाणाचे रोहितच्या आयुष्यात खूप महत्व आहे.

6 / 7

रोहित शर्माने गुडघे टेकून हातात हिऱ्याची अंगठी घेऊन रितिकाला प्रपोज केले. मुंबईतील बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहितने रितिकाला प्रपोज केले होते. हे तेच मैदान आहे जिथे रोहित शर्माने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. रोहितच्या या सरप्राईजने रितिका खूप खूश झाली आणि तिने हा प्रस्ताव स्वीकारला.

7 / 7

यानंतर रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी 3 जून 2015 रोजी एंगेजमेंट केले आणि 13 डिसेंबर 2015 रोजी लग्नगाठ बांधली. रोहित आणि रितिका यांचा विवाह ताज लँड्स हॉटेलमध्ये झाला, जिथे क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. रितिका ही बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची माजी पत्नी सीमा खानची चुलत बहीण आहे.

टॅग्स :रोहित शर्माऑफ द फिल्डलग्नयुवराज सिंग
Open in App