Cricket Players Wife: 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी ॲथलीट्स खेळाडूंसोबत थाटला संसार, पाहा फोटो

क्रिकेट विश्वातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी ॲथलीट्स खेळाडूंशी लग्नगाठ बांधली आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची संपूर्ण कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. २००७ टी-२० विश्वचषक संघाचा भाग असलेल्या उथप्पाने २०१६ मध्ये शीतलसोबत लग्न केले. जिने युवा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय टेनिस संघाचे प्रतिनिधित्व केले होते. शीतल एक टेनिस खेळाडू राहिली असून तिने वयाच्या नवव्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरूवात केली होती आणि ३३ व्या वर्षी संन्यास घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील घातक गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ॲलिसा हिली हे दोघेही क्रिकेटर आहेत. दोघेही जण ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी क्रिकेट खेळतात. ॲलिसा ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार आहे तर स्टार्क पुरूष संघातील प्रमुख खेळाडू आहे. अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ॲलिसाच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले होते.

या यादीमध्ये शोएब मलिक हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने दुसऱ्या देशातील ॲथलीट खेळाडूशी लग्न केले आहे. शोएब आणि सानिया यांनी २००९ पासून एकमेकांना डेटिंग करण्यास सुरूवात केली होती. सानिया ही एक प्रसिद्ध टेनिस खेळाडू असून तिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. सहा ग्रँडस्लॅम जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कॅंडिस वॉर्नरसोबत रिल्स बनवून अनेकवेळा आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. वॉर्नरशी लग्न करण्यापूर्वी कॅंडिस आयर्नमॅन मालिकेत व्यावसायिक स्पर्धक होती, जो ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध वॉटर-स्पोर्ट सर्फिंग इव्हेंट आहे.

निकिता वंजारापासून वेगळे झाल्यानंतर दिनेश कार्तिकने ऑगस्ट २०१५ मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले. पल्लीकल ही महिला क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणारी भारतातील पहिली खेळाडू ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील दीपिकाने पदक पटकावले होते.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माची पत्नी प्रतिमा ही बास्केटबॉल खेळाडू आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस ॲंड मेरी कॉलेजमधून आपला हा प्रवास सुरू केला होता. २०१० च्या ग्वांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.