Join us

IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:12 IST

Open in App
1 / 9

आयपीएल २०२४ चा हंगाम गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे रियान पराग. राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूने यंदाच्या आयपीएलमध्ये कमाल केली. त्याने ५०० हून अधिक धावा करताना अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला.

2 / 9

काही हंगामात सातत्याने फ्लॉप ठरलेल्या परागने यंदा जबरदस्त पुनरागमन केले. पण, आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच रियान पराग एका वादात सापडला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रियानची युट्यूब हिस्ट्री दिसत आहे.

3 / 9

२२ वर्षीय रियान पराग युट्यूबवर स्ट्रिमिंग करताना दिसत आहे. यादरम्यान तो कॉपी राइट फ्री म्युजिक सर्च करत होता. तेव्हा तिथे आधी सर्च केलेल्या बाबी समोर आल्या. यामध्ये 'अनन्या पांडे हॉट', 'सारा अली खान हॉट', असे दिसले.

4 / 9

यामध्ये विराट कोहलीचे देखील नाव दिसत आहे. रियान पराग आणि वाद हे समीकरण नवीन नाही. आयपीएलमध्ये एकदा त्याचा मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलसोबत वाद झाला होता.

5 / 9

वरिष्ठ खेळाडूंसोबत पंगा घ्यायला तो मागे पुढे पाहत नाही. मागील वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने मी वरचा दर्जा खेळाडू असल्याचा इशारा केला होता.

6 / 9

रियान पराग टीम इंडियात स्थान मिळवण्याचा दावा करणाऱ्यांपैकी एक दावेदार आहे. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी अप्रतिम आहे.

7 / 9

त्याने आयपीएल २०२४ च्या १६ सामन्यांमध्ये ५७३ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले.

8 / 9

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शेवटच्या हंगामात त्याने १० सामन्यात ५१० धावा केल्या होत्या. यामध्ये सलग ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

9 / 9

आयपीएल २०२४ मध्ये त्याने आपल्या फलंदाजीत सातत्य दाखवले. एक यशस्वी फलंदाज म्हणून त्याने संघात स्थान निर्माण केले.

टॅग्स :अनन्या पांडेसारा अली खानबॉलिवूडराजस्थान रॉयल्सऑफ द फिल्ड