पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज हिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कायनात इम्तियाज हिने एक प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
२९ वर्षांची पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज ही तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत राहते. कायनात इम्तियाज नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
सोमवारी कायनात इम्तियाज हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे फोटो शेअर केले होते ज्यांना पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. कायनात इम्तियाज हिने लाल ड्रेसमध्ये बॅट घेऊन जबरदस्त प्री-वेडिंग फोटोशूट केलं होतं.
या फोटोंमध्ये कायनात इम्तियाज सुंदर दिसत आहे. कायनातने मोहम्मद वकार उद्दीन याच्यासोबत विवाह केला आहे. कायनातचा विवाह ३० मार्च रोजी झाला होता. मात्र आता त्याने आपले फोटो शेअर केले आहेत.
कायनात इम्तियाजने पाकिस्तानसाठी १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्यामध्ये ६.१५ च्या इकॉनॉमी रेटने ९ विकेट्स टिपले आहेत. तसेच तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२४ धावाही जमवल्या आहेत. कायनातने १५ टी-२० सामन्यांमध्ये ९ विकेट्स आणि १२० धावा जमवल्या आहेत.