विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री

Virat Kohli Rohit Sharma Ravi Shastri IND vs SA: रोहित आणि विराट सध्या २०२७च्या विश्वचषकाकडे डोळे लावून बसले आहेत

भारतीय संघाचे दोन बडे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या मैदान गाजवताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यांनी आपली चमक दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितने एक अर्धशतक आणि एक शतक ठोकले. नंतर आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यातही रोहित शर्माने तोच फॉर्म कायम ठेवत अर्धशतक केले.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात अर्धशतक केले होते. त्यानंतर आफ्रिकेविरूद्ध त्याने सलग दोन सामन्यात दोन शतके ठोकली आणि टीकाकारांसह साऱ्यांनाच गप्प करून टाकले.

दोन्ही खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. २०२७चा विश्वचषक खेळण्यासाठी फिटनेसवरही मेहनत घेत आहेत. अशातच माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक सल्ला दिला आहे.

रोहित आणि विराट दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यांना तसे करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. तशातच रवी शास्त्रींचे विधान महत्त्वाचे ठरत आहे.

"विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही 'दादा' खेळाडू आहेत. ते दोघेही खूप बडे खेळाडू आहेत. विराट-रोहितसारख्या बड्या खेळाडूंच्या नादाला लागू नका."

"काही लोक विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंशी उगाच वैर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला दिसत आहे."

"अशाप्रकारे बड्या खेळाडूंच्या वाट्याला जाऊ नका. जर दोघांनी एकत्र येऊन काही ठरवलं तर मग जे लोक नादाला लागलेत ते कुठे गायब होतील कळणारही नाही"