भारत आणि इंग्लंडच्या संघांमधील कसोटी मालिका सध्या इंग्लंडमध्ये रंगलेली असतानाच क्रीडा जगतातील प्रतिष्ठित अशी विम्बल्डन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतीत पुरुष एकेरीचं विजेतेपद यानिक सिनर याने पटकावले. विम्बल्डनमधील सामने पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आवर्जुन उपस्थिती लावली. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक आणि प्रख्यात समालोचक रवी शास्त्री यांची या स्पर्धेतील उपस्थिती लक्षवेधी ठरली. यादरम्यानचा एक फोटो आता चर्चेचा विषय ठरला आहे.