Join us

Raksha Bandhan: अशी आहे विराट कोहलीची बहीण, प्रसिद्धीपासून राहते दूर, सांभाळते भावाचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 12:00 IST

Open in App
1 / 5

भावा बहिणीमधील प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षा बंधनाचा सण आज संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या हातात प्रेमावे एक धागा बांधते. यावेळी सुख-दु:खाच्या क्षणी साथ देण्याचे वचन दिले जाते. क्रीडा जगतामध्येही भावा बहिणींच्या अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. यामधील काही भावांनी बहिणींच्या यशासाठी आकाशपाताळ एक केले. तर काही बहिणींनी त्यांच्या भावांना यशाच्या शिखरावर पोहोचवले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची बहीण भावना कोहली यांचे नातेही असेच आहे.

2 / 5

विराटची बहीण भावना कोहली हिला प्रसिद्धीपासून दूर राहायला आवडते. ती तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवणे पसंद करते. सोशल मीडियावरसुद्धा ती कुटुंबासोबचीच छायाचित्रे शेअर करत असते.

3 / 5

भावना हिला कॅमेऱ्यापासून दूर राहायला आवडते. याचं खास उदाहरण म्हणजे विराट कोहलीचा विवाह सोहळा. या सोहळ्यात मोठी बहीण म्हणून भावना विराटसोबत होती. मात्र ती कॅमेऱ्यासमोर फारच कमी वेळा आली.

4 / 5

भावना प्रसिद्धीच्या झोतात नसली तरी ती विराट कोहलीचा बिझनेस अगदी चोखपणे सांभाळत आहे. तिने हा बिझनेस नव्या उंचीवर नेला आहे. विराट कोहली क्रिकेटमध्ये गुंतलेला असल्याने या बिझनेसची जबाबदारी भावना हिनेच सांभाळलेली आहे.

5 / 5

भावना कोहलीने संजय ढिंगरा यांच्यासोबत विवाह केला आहे. तिची दोन मुले आहेत. महक आणि आयुष अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :विराट कोहलीरक्षाबंधनपरिवार
Open in App