Join us

बाप कोच, तर लेक कॅप्टन! राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्णधार, कोणत्या संघाचं नेतृत्व सांभाळणार वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:24 IST

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा अन्वय आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अन्वय द्रविड आता कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

2 / 7

राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड आणि थोरला मुलगा समित द्रविड दोघंही कर्नाटकातील उदयोन्मुख खेळाडू आहेत. अन्वय कर्नाटकातील अंडर-१४ संघाचं नेतृत्व करणार आहे

3 / 7

मोठा मुलगा समित द्रविड आपल्या वडिलांना आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना पाहून मोठा झाला आहे. तर, धाकटा मुलगा अन्वय याला आपल्या वडिलांना खेळताना पाहण्याची फारशी संधी मिळालेली नाही. पण, दोन्ही मुलांमध्ये वडिलांच्या क्रिकेट कौशल्याची छबी स्पष्टपणे दिसून येते. अन्वय एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो.

4 / 7

आता राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षकच घरात गुरू तर मुलगे या खेळात नक्कीच पारंगत होतील यात शंका नाही. वडिलांकडून क्रिकेटचे बारकावे शिकलेला अन्वय द्रविड सध्या कर्नाटकच्या १४ वर्षांखालील संघाचा एक भाग आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता त्याला अंडर-१४ इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये कर्नाटक संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे.

5 / 7

राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित देखील कर्नाटक क्रिकेटमधील एक उदयोन्मुख नाव आहे. त्याच्या फलंदाजीमध्ये त्याच्या वडिलांची झलक आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यानं वडिलांकडूनच क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. क्रिकेटशिवाय समितला ट्रव्हलिंग, संगीत आणि पोहण्याचीही आवड आहे.

6 / 7

दोन वर्षांपूर्वी अंडर-14 इंटर-झोनल स्पर्धेत कर्नाटक संघाचा कर्णधार बनलेल्या अन्वयने त्याचा मोठा भाऊ समितसह धडाकेबाज खेळी खेळली होती.

7 / 7

BTR शील्ड अंडर १४ शालेय स्पर्धेत दोन भावांनी द्विशतकी भागीदारी रचली. यष्टीरक्षक फलंदाज अन्वयने ९० धावा केल्या होत्या. दोन्ही भावांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या शाळेला स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली होती.

टॅग्स :राहुल द्रविड
Open in App