Join us

R Ashwin Wife Crying: "माझी बायको तेव्हा ढसाढसा रडत होती"; आर अश्विनने सांगितलेला किस्सा वाचून तुम्हीही नक्कीच व्हाल 'इमोशनल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 23:32 IST

Open in App
1 / 9

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाला गाबाच्या मैदानावर धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताचा हा विजय पुढची बरीच वर्षे चर्चेत असेल यात वादच नाही. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा अभेद्य गड भेदल्याची कहाणी साऱ्यांनाच चांगली लक्षात आहे.

2 / 9

गाबावरील विजय अविस्मरणीय होताच. पण रविचंद्रन अश्विनने त्या सामन्याआधी त्याच्या बायकोसोबत घडलेला एक अतिशय भावनिक किस्सा सांगितला.

3 / 9

ऑस्ट्रेलियातील हॉटेलच्या त्या रूममध्ये अश्विनची बायको अक्षरश: लहान मुलासारखी ढसढसा रडत असल्याचा किस्सा अश्विनने नुकताच एका मुलाखतीत शेअर केला.

4 / 9

'मी आणि माझी पत्नी गेली दहा वर्षे वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने परदेशात जातो. पण आम्हाला रूममध्ये बंदिस्त राहण्याची सवय नव्हती.'

5 / 9

'ब्रिसबेनला जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा क्वारंटाईनच्या नियमानुसार आम्हाला रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं. तुम्ही कुठेही बाहेर फिरू शकत नाही असं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं.'

6 / 9

'ते लोक गेल्यानंतर दहा मिनिटांतच मला रूममधून रडण्याचा आवाज आला. मी पाहिलं तर माझ्या दोन्ही मुली रडत नव्हत्या. पण माझी बायको प्रिती रडायला लागली होती.'

7 / 9

'प्रितीला ढसाढसा रडताना बघून मी तिच्याजवळ गेलो आणि तिला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा तिचं उत्तर ऐकून मलाही वाईट वाटलं'

8 / 9

'ती म्हणाली की मला का रडू येतंय हे मला खरंच कळत नाहीये. पण मला आता हॉटेलच्या रूममध्ये बंदिस्त राहण्याचा खूप कंटाला आलाय. मला हे सहन होत नाहीये.'

9 / 9

'तू सरावासाठी बाहेर जातोस तेव्हा तरी तुला ताजी हवा मिळते. मी तुझ्या प्रेमापोटी इतके दिवस सहन केलं. पण आता मला हे सहन होत नाहीये. हे खूप अमानवीय आहे असं रडत-रडतच तिने मला सांगितलं', असा अतिशय भावनिक किस्सा अश्विनने सांगितला.

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघ
Open in App