टीम इंडियातील स्टार फलंदाजाचा पुन्हा प्रेमभंग, आता दुसऱ्या गर्लफ्रेंडनेही केलं ब्रेकअप

Prithvi Shaw: जबरदस्त फॉर्म दाखवत भारतीय संघात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो.

जबरदस्त फॉर्म दाखवत भारतीय संघात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत पृथ्वी शॉ याला अंतिम संघात स्थान मिळू शकलेले नाही. त्यातच आता पृथ्वी शॉ संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पृथ्वी शॉ आणि त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड निधी तपाडिया यांचं ब्रेकअप झालं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पृथ्वी शॉ आणि निधी तपाडिया एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता या दोघांचंही ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही काळात पृथ्वी शॉ आणि निधी यांनी एकमेकांसोबत अनेक फोटो शेअर केले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

निधी तपाडिया हिने हल्लीच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. त्याच्या बॅकग्राऊंडला तिने ब्रेकअप साँग लावले होते. एवढंच नाही तर पृथ्वी शॉ आणि निधी तपाडिया यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे.

निधी तपाडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. निधी तपाडियाचे इन्स्टाग्रामवर १ लाख ८ हजार फॉलोअर्स आहेत. ती मुळची महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील आहे.

पृथ्वी शॉ नववर्षाची पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये गेला असताना निधी त्याच्यासोबत दिसली होती. दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पृथ्वी शॉ याआधी अभिनेत्री प्राची सिंह हिला डेट करत होता. २०२० मध्ये त्यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप होऊन त्या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं होतं.