Join us
Daily Top 2Weekly Top 5

See Pics : पृथ्वी शॉनं दिली प्रेमाची कबुली?; अभिनेत्रीसोबत केलं नववर्षाचं स्वागत, जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:11 IST

Open in App
1 / 7

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) या रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे. मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही पृथ्वीला निवड समितीनं संधी दिलेली नाही.

2 / 7

पण, पृथ्वी शॉ पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या इंस्टा स्टोरीमुळे ही चर्चा रंगली आहे. पृथ्वीनं २०२२ नव वर्षाचं स्वागत अभिनेत्री प्राची सिंह हिच्यासोबत केलं.

3 / 7

प्राचीनं तिच्या इंस्टास्टोरीवर दोघांचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. पृथ्वीनंही त्या स्टोरीचा स्क्रीनशॉट स्वतःच्या इंस्टास्टोरीवर शेअर केला आणि पृथ्वी -प्राची यांच्या प्रेमाची पुन्हा चर्चा रंगली.

4 / 7

पृथ्वी व प्राची यांची इस्टा स्टोरी पाहून या दोघांनी प्रेमाची कबुली दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्राची सिंह हिनं Colors TVवरील उडान या कार्यक्रमात काम केलं होतं. याधीही या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या.

5 / 7

पृथ्वीच्या सोशल मीडियावरील पोस्टवर प्राचीच्या कमेंट नेहमी पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर ती तिच्या इंस्टास्टोरीवर पृथ्वीचे फोटे नेहमी ठेवतेय. पण, या दोघांचे एकत्रित फोटो कधीच पाहायला मिळाले नव्हते.

6 / 7

२०२२च्या स्वागतासाठी ही दोघं एकत्र आली आणि त्यांनी फोटोही पोस्ट केल्यानं या दोघांनी प्रेमाची कबुली दिलीय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

7 / 7

टॅग्स :पृथ्वी शॉइन्स्टाग्राम
Open in App