Join us

Prithvi Shaw New House : पृथ्वी शॉने खरेदी केलं १०.५ कोटींचं आलिशान घर; खिडकीतून दिसतो Sea-Link, Bollywood सेलिब्रेटी शेजारी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:24 IST

Open in App
1 / 11

Prithvi Shaw New House : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने आयपीएलमधून मागील पाच वर्षांत कमावलेली संपूर्ण रक्कम आलिशान घर खरेदी करण्यात खर्ची घातली आहे. वांद्रे येथे त्याने १०.५ कोटींचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केली आहे.

2 / 11

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार वांद्रे येथील 81 Aureate या टॉवरमध्ये ८व्या मजल्यावर पृथ्वीने अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्याचा कारपेट एरिया २२०९ स्क्वेअर फूट असून त्याला १६५४ स्क्वेअर फूटचे टेरेस आहे आणि ती कारचे पार्किंग स्लॉटही आहे.

3 / 11

२२ वर्षीय पृथ्वी २०१८ पासून अधिक चर्चेत आला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. त्याच वर्षी दिल्ली कॅपिटल्सने १.२ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर पृथ्वीने आपल्या आक्रमण खेळीच्या जोरावर स्वतःची मार्केट व्हॅल्यू वाढवली.

4 / 11

दिल्लीने यंदा ७.५० कोटींत पृथ्वी शॉ याला रिटेन केले. मागील पाच वर्षांत पृथ्वीने आयपीएलमधून १२.३० कोटी कमावले आणि त्यापैकी जवळपास सर्वच रक्कम त्याने वांद्रे येथे आलीशान घर खरेदी करण्यात खर्ची घातले.

5 / 11

पृथ्वीने ज्या टॉवरमध्ये अपार्टमेंट घेतले आहे. त्या टॉवरमध्ये सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, अर्जुन कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींनीही अपार्टमेंट खरेदी केल्याची चर्चा आहे.

6 / 11

पाहा पृथ्वीच्या नव्या घराचे फोटो...

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :आयपीएल २०२२पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्ससोनाक्षी सिन्हामलायका अरोरा
Open in App