भारताचा सिक्सर किंग असलेल्या युवराज सिंगने या वर्षीच निवृत्ती घेतली. युवराजसारख्या मोठ्या खेळाडूला मैदानात निवृत्ती न घेतल्याची सल कायम मनात राहील.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने या वर्षात आपली निवृत्ती घेतली. मलिंगा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळणार नसला तरी तो लीगमध्ये नक्कीच खेळणार आहे.
भारताच्या विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने अंबाती रायुडू चांगलाच वैतागला होता. त्यामुळेच त्याने तडकाफडकी निवृत्ती घेतली.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा एकेकाळी कणा समजल्या जाणाऱ्या हशिम अमलानेही या वर्षी आपली निवृत्ती जाहीर केली.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने फलंदाजांना चांगलेच नाचवले होते. पण अखेर या वर्षी ताहिरने निवृत्तीचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने या वर्षी आपली निवृत्ती जाहीर केली.