भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत हा सध्या चर्चेत आला तो बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने मुलाखतीत केलेल्या RP या उल्लेखामुळे. त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी ही भारत-पाकिस्तान सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२मध्ये इशा दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांना रिषभला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहिली होती.
अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या हा भारतीय संघासोबत दुबईत दाखल झाला आहे. त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिचही दुबईत दाखल होऊ शकते. नताशा हार्दिकला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा स्टेडियमवर उपस्थित असल्याचे पाहिले गेले आहे.
युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या नात्यांबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पण, या दोघांनी त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईसाठी रवाना होताना धनश्री विमानतळावर त्याला सोडण्यासाठी आली होती. पण, ती भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दुबईत येण्याची शक्यता आहे.
दिनेश कार्तिकचे पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. २०१९च्या वर्ल्ड कपनंतर त्याने जिद्दीने आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले. आयपीएल २०२२मध्ये फिनिशर म्हणून तो नव्याने जगासमोर आला अन् त्याची आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी संघात निवड झाली. कार्तिकचे मनोबल आणखी उंचावण्यासाठी पत्नी व स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलही दुबईत दाखल होऊ शकते.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे. रितिका ही रोहितची मॅनेजरही आहे.