Join us

Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:00 IST

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं मुंबईपाठोपाठ पुण्यातही घर घेतले आहे. आयपीएल २०२१ स्थगित झाल्यामुळे कॅप्टन कूल धोनी सध्या रांची येथील फार्म हाऊसवर सुट्टी एन्जॉय करतोय.

2 / 11

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. कॅप्टन कूल धोनीनं ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आयपीएल २०२१त धोनीची झलक पाहायला मिळाली. पण, कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करावी लागली.

3 / 11

त्यानंतर धोनी कुटुंबीयांसोबत रांचीच्या फार्महाऊसवरच आहे. क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतर त्याने आधीचं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केलं होतं. या घरात धोनी 8 वर्ष राहीला. 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला.

4 / 11

रांची येथे धोनीचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यासाठी त्यानं मागील महिन्यात 8 लाख किमतीचा ट्रॅक्टरही खरेदी केला.

5 / 11

धोनी मनोरंजन क्षेत्रातही उतरणार आहे आणि गतवर्षी धोनीच्या प्रोडक्शन कंपनीनं एक डॉक्युमेंटरीही लाँच केली होती आणि साक्षी ही त्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यासाठी त्यानं अंधेरीत एक ऑफिसही खरेदी केलं आहे.

6 / 11

मुंबईतही धोनीचं घर उभं राहत आहे. धोनीची पत्नी साक्षी हिनं तिच्या इंस्टा स्टोरीवर मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो पोस्ट केले होते. त्यात त्यांच्या घराचे काम सुरू असल्याचे दिसत आहेत.

7 / 11

साक्षीनं पोस्ट केलेल्या फोटोसारखाच फोटो आर्किटेक्चर डिझायनर शंतनू गर्ग यांनी पोस्ट केला. त्यामुळे धोनी व साक्षी यांच्या स्वप्नातलं घर गर्ग तयार करत असल्याची चर्चा रंगली आहे.

8 / 11

त्यात आता धोनीनं पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari-Chinchwad) नवीन घर घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. गहुंजे स्टेडियमच्या आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याची धोनीला भुरळ पडली आणि त्याने इकडे घर घ्यायचं ठरवलं.

9 / 11

एस्टाडो प्रेसिडेन्शियल असं धोनीने घर घेतलेल्या सोसायटीचं नाव आहे. पुण्यात काही कामासाठी जर येणं झालं तर धोनी इकडेच येऊन राहतो. सोसायटीतल्या काही जणांनी धोनीला पहाटे 5 वाजता जॉगिंग करतानाही पाहिलं आहे.

10 / 11

11 / 11

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीपुणे