Join us

OMG : KKRच्या प्रमुख खेळाडूचा 'या' सुंदरीशी साखरपुडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:30 IST

Open in App
1 / 8

2020 हे वर्ष क्रिकेटपटूंच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं दुबईत गर्लफ्रेंड नताशा स्टँकोव्हिच हिच्याशी साखरपुडा केला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही घोषणा केली.

2 / 8

त्यानंतर भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे आणि अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांनी मुंबईत विवाह केला. आता यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाच्या प्रमुख खेळाडूनं प्रेयसीसोबत बुधवारी साखरपुडा केला.

3 / 8

आयपीएल 2020 लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनंवर KKRसंघानं 15.5 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला.

4 / 8

कमिन्सला 2019चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा मान मिळाला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियन संघाला अॅशेस मालिका कायम राखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. शिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांविरुद्धच्या कसोटी मालिका विजयातही कमिन्सनं महत्त्वाची भूमिका वटवली होती.

5 / 8

कमिन्सने 2019च्या कॅलेंडर वर्षात 12 कसोटी सामन्यांत 59 विकेट्स घेतल्या. 2019मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्यानं सहकारी नॅथन लियॉनला ( 45) दुसऱ्या स्थानावर टाकले.

6 / 8

मिचेल जॉन्सन यानं 2009मध्ये 13 कसोटीत 63 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यानंतर कमिन्सच्या रुपानं ऑसी गोलंदाजानं केलेली दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.

7 / 8

कमिन्सची मूळ किंमत ही 2 कोटी होती आणि त्यानंतर त्याला संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. 2017च्या आयपीएलमध्ये बेन स्टोक्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघानं 14.5 कोटींत घेतलं होतं.

8 / 8

अशा या हरहुन्नरी गोलंदाजानं गर्लफ्रेंड बेकी बॉस्टनसोबत साखरपुडा केला. या दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020कोलकाता नाईट रायडर्सआॅस्ट्रेलिया