IND vs AUS: पाकिस्तानी ट्विटर हँडलचे घाणेरडे कृत्य; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना घाबरवण्याचे षडयंत्र!

20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारताकडे रवाना देखील झाला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर पॅट कमिन्सने याबाबतचा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रवाना झाल्याची माहिती त्याने यात दिली आहे. कमिन्सनेही 'थम्सअप'चे संकेत दिले. या फोटोला आता पाकिस्तानी ट्विटर हँडलवरून घृणास्पद कमेंट केल्या जात आहेत.

कमिन्सच्या या ट्विटवर पाकिस्तानच्या काही ट्विटर हँडलवरून भीती दाखवणाऱ्या कमेंट करण्यात आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, प्रवासाच्या बाबतीत भारत देश सुरक्षित देश नाही. त्याचवेळी दुसर्‍या युजरने कमिन्सला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, जेव्हा या युजर्सबाबत अधिक माहिती तपासली तेव्हा समोर आले की हे ट्विटर हँडल लाहोर, पाकिस्तानमधून चालवले जात आहे. सय्यद मुर्तझा हैदर नावाच्या युजरने स्वत:चे वर्णन एमबीए पदवी धारक असल्याचे केले आहे आणि त्याच्या हँडलवर इतर बँकेत क्षेत्र व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याचे देखील म्हटले आहे.

भारतीय चाहत्यांनी या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे, जे पॅट कमिन्सला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच हे पाकिस्तानी युजर्स या मुद्द्यावरून भारताची बदनामी करत असल्याचे समोर येत आहे. याशिवाय इतर युजर्सच्या ट्विटवरही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन संघ आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, ज्याची सुरूवात 20 सप्टेंबरपासून होणार आहे. या वर्षी 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे, ज्याचे आयोजन ऑस्ट्रेलिया करत आहे. अशा परिस्थितीत ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे, ज्यामुळे दोन्ही संघांना चांगला सराव करता येणार आहे.

अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-0 ने शानदार विजय मिळवला होता. स्टीव्ह स्मिथने अखेरच्या सामन्यात शतकी खेळी करून विश्वचषकासाठी तयार असल्याचे संकेत दिले होते. आरोन फिंचने न्यूझीलंडविरूद्ध आपल्या एकदिवसीय कर्णधार पदाच्या कार्यकाळातील शेवटचा सामना खेळला. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात आरोन फिंच केवळ ५ धावा करून बाद झाला.