Join us

Javed Miandad, India vs Pakistan: "वेगवान गोलंदाजीचा सामना कसा करायचा ते 'या' भारतीय फलंदाजाकडून शिका"; पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा तरूण पिढीला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:55 IST

Open in App
1 / 6

Javed Miandad, India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका गेले कित्येक वर्षांपासून होत नाहीत. दोन देशांमधील राजकीय तणावामुळे ICCच्या स्पर्धांव्यतिरिक्त इतर वेळी भारत-पाक आमनेसामने येत नाहीत.

2 / 6

असे असले तरी दोन्ही देशांमध्ये अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि अनेक आजी माजी खेळाडू एकमेकांचे कायम कौतुक करत असतात.

3 / 6

भारताबाबत सहसा सकारात्मक विधाने न करणाऱ्या पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने या वेळी भारताच्या एक फलंदाजाचे नुकतेच तोंडभरून कौतुक केले आहे.

4 / 6

वेगवान गोलंदाजी कशी खेळावी, हे या भारतीय फलंदाजाचे व्हिडीओ पाहून शिका, असा सल्ला त्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना दिला आहे.

5 / 6

जावेद मियाँदाद म्हणाला, 'मला भारताचा एक फलंदाज आवडायचा. त्याची प्रतिभा अद्भुत होती. उंची जास्त नसूनही तो खेळाडू देशभरात अतिशय शानदार फलंदाजी करायचा. त्याच्या कामगिरीतील सातत्य कमाल होते.'

6 / 6

'तो फलंदाज म्हणजे सुनील गावसकर. आजकालच्या फलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीच्या व्हिडीओ पाहिल्या तर त्यांना खूप काही शिकता येईल. गावसकर कमी उंचीचे होते पण वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या खतरनाक वेगवान गोलंदाजांपुढे त्यांनी आपली फलंदाजी दाखवून दिली आणि यशस्वी ठरले', असे मियाँदाद म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानजावेद मियादादसुनील गावसकरभारतपाकिस्तान
Open in App