T20 World Cup 2022 : रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्यात काय आहे फरक, Pak च्या माजी कर्णधारानं सांगितलं सत्य

2022 चा टी20 विश्वचषक आतापर्यंत कर्णधारांसाठी चांगला राहिला नाही.

2022 चा टी20 विश्वचषक आतापर्यंत कर्णधारांसाठी चांगला राहिला नाही. मग ते भारताचा कर्णधार रोहित शर्मा, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर किंवा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्याबद्दल असो.

या सर्वच कर्णधारांचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, परंतु यापैकी एकही खेळाडू मोठा प्रभाव सोडू शकला नाही. याबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने आपले मत व्यक्त केले आहे.

“कोणताही कर्णधार फॉर्ममध्ये दिसत नाही. परंतु केन विलियमसन प्रत्येक सामन्यात आपलं योगदान देण्यात यशस्वी ठरला आहे,” असे सलमान बट म्हणाला. जर तुम्ही रोहित शर्माला पाहिलं तर त्यालादेखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. केन विलियमसनबद्दलही तेच आहे. परंतु त्यानं ३०-४० धावा केल्या, परंतु त्याचा स्ट्राईकरेट चांगला नाही.

याशिवाय त्यानं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम यांची तुलना केली. “रोहित शर्मा बाबर आझमपेक्षा सरस आहे. कमीतकमी तो आपले शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराबाबत असं दिसून येत नाही,” असंही तो म्हणाला.

बाबर आझमबद्दल सांगायचं झालं तर त्याच्याकडे फॉर्म नाही. रोहित शर्माचं इंटेट जास्त आहे. परंतु त्याला तितकं यश मिळत नाही. जर त्यानं एखादा शॉट खेळला तर तो एखाद्या फिल्डरच्या हाती जातो, असंही सलमान बटनं स्पष्ट केलं.

“फॉर्मचा प्रश्न रोहित शर्मा आणि बाबर आझम दोघांसोबतही आहे. परंतु रोहित शर्माचा खेळ स्पष्ट आहे. तो शॉट खेळताना बाद होतो. बाबर आझमचं तसं नाही. हाच दोघांमध्ये फरत आहे. रोहित शर्मा आऊट जरी होत असला तरी तो आक्रमक खेळतो. परंतु बाबर आझम दबावात खेळतोय. त्याच्यावर ताणही खुप वाढत आहे,” असंही त्याने नमूद केलं.