Join us

Shaheen Afridi Wedding: शाहीन आफ्रिदी शाहिद आफ्रिदीचा झाला जावई; कराचीत पार पडला 'विवाहसोहळा', पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:30 IST

Open in App
1 / 6

पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आज विवाहबंधनात अडकला आहे. अलीकडेच पाकिस्तानी संघाने मायदेशात इंग्लंडविरूद्ध आणि न्यूझीलंडविरूद्ध मालिका खेळली. मात्र, दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.

2 / 6

शाहीन आज अधिकृतपणे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई झाला. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीसोबत लग्नगाठ बांधली.

3 / 6

पाकिस्तानातील प्रमुख शहर असलेल्या कराचीतील मशिदीत हा विवाहसोहळा पार पडला. अंशा ही आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. शाहीनची बायको अंशा अनेकदा सामना पाहताना जगासमोर आली आहे.

4 / 6

शाहीनने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे. अंशाशी लग्न करण्यासाठी शाहीनला बराच काळ वाट पाहावी लागली. खरं तर दोन वर्षांपूर्वी या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली होती.

5 / 6

शाहिद आफ्रिदीने याबाबत माहिती देताना म्हटले होते, 'माझी मुलगी अंशा आणि 22 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आमच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होणार होईल. लग्नानंतर शाहीन पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात सहभागी होणार आहे. तो पीएसएलमधील लाहोर कलंदर संघाचा एक भाग आहे.'

6 / 6

टॅग्स :पाकिस्तानशाहिद अफ्रिदीलग्नऑफ द फिल्ड
Open in App