CT 2025: खुदा मेहेरबान तो...! एकही सामना न जिंकता पाकिस्तानला मिळणार कोट्यवधींची बक्षीसं

Pakistan Price Money in Champions Trophy 2025: पाकिस्तानचा संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला

अनेक वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. पण त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर हसावे की रडावे हेच क्रिकेटप्रेमींना कळेनासे झाले.

पाकिस्तानला या स्पर्धेतून एकही विजय न मिळवता बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळेच पाकिस्तानने केलेला सर्वप्रकारचा खर्च पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. सुरुवातीला न्यूझीलंड आणि नंतर भारताने पाकिन पराभवाची धूळ चारली.

त्यानंतर आज बांगलादेश विरूद्ध विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. पण त्यांची विजयी निरोप घेण्याची आशाही भंगली. बांगलादेशविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

या विचित्र प्रसंगामुळे खुद्द यजमान असलेल्या पाकिस्तानच्या संघाला स्पर्धेच्या साखळी फेरीत तर बाहेर व्हावे लागलेच. पण त्यातही विशेष म्हणजे त्यांनी स्पर्धेतील ३ पैकी एकाही सामन्यात विजय न मिळवता गाशा गुंडाळावा लागला.

पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नसला तरीही त्यांना रिकाम्या हाती जावे लागणार नाहीये. ICC च्या नियमांनुसार पाकिस्तानच्या संघालाही ठराविक रक्कम स्पर्धेतील सहभागासाठी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला १ गुण मिळाला. त्यामुळे पाकिस्तानी संघ पॉइंट्स टेबलमध्ये किमान ८व्या स्थानी नक्कीच राहील व नियमानुसार पाकिस्तानलाही ICC कडून कोट्यवधींची बक्षिसे मिळतील.

७व्या आणि ८व्या क्रमांकाच्या संघांना १.४० USD म्हणजेच १ कोटी २२ लाख मिळतील. याशिवाय, सामना जिंकल्यास ३४ हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस होते. ते पाकिस्तान-बांगलादेशमध्ये विभागले जाईल.

म्हणजेच पाकिस्तानला गुणतालिकेतील क्रमांकाचे १ कोटी २२ लाख, सामना रद्द झाल्याचे १५ लाख असे १ कोटी ३७ लाख मिळतील. याशिवाय स्पर्धेतील सहभागाचे प्रत्येक संघाला १.२५ लाख USD म्हणजे १ कोटी रुपये मिळतील.