Join us

PHOTOS: पाकिस्तानचा खेळाडूंच्या फिटनेसवर विशेष भर; लष्करांच्या जवानांकडून घेतले धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:26 IST

Open in App
1 / 10

पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे शिलेदार काकुल, अबोटाबाद येथील फिटनेस शिबिरात सहभागी झाले.

2 / 10

त्यांनी आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षण घेतले. यावेळी खेळाडूंचा धावण्याचा सराव घेण्यात आला. २९ खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले असल्याची माहिती बोर्डाने दिली.

3 / 10

अलीकडेच पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसिमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतत असल्याची घोषणा केली. आगामी विश्वचषकात वसिम पाकिस्तानी संघाचा भाग असेल यात शंका नाही. त्याच्याशिवाय मोहम्मद आमिरने देखील राजीनामा परत दिला आहे.

4 / 10

पाकिस्तान सुपर लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा उस्मान खान देखील जवानांकडून प्रशिक्षणाचे धडे घेताना दिसला.

5 / 10

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक, न्यूझीलंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका, आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका यासाठी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली.

6 / 10

माजी कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सैय अयुब, फखर झमान, साहिबजादा फरहान, हसीबुल्ला, सौद शकील, उस्मान खान, मोहम्मद हारिस, सलमान अली अगा, आझम खान, इफ्तिखार अहमद, इरफान खान नियाझी, शादाब खान हे खेळाडू प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले होते.

7 / 10

तसेच इमाद वसिम, उसामा मीर, मोहम्मद नवाज, मेहरान मुमताज, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद अली, झमान खान, मोहम्मद वसीम ज्युनियर, आमिर जमाल, हारिस रौफ आणि मोहम्मद आमिर यांचा देखील सहभाग होता.

8 / 10

अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन निवड समिती स्थापन केली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जुनी समिती बरखास्त केली आणि नवीन समितीमधील प्रत्येक सदस्याला समान अधिकार दिले.

9 / 10

भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी केली. अफगाणिस्तानसारख्या संघाकडून देखील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता.

10 / 10

यानंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीला तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे सोपवले. पण, आगामी काळात पाकिस्तानचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024