Join us  

Shahzad azam rana: शोककळा! बाबर आझमने सहकारी गमावला, ३६ वर्षीय खेळाडूचे 'हार्ट अटॅक'ने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 4:40 PM

Open in App
1 / 6

पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शहजाद आझम राणा याचे वयाच्या 36व्या वर्षी निधन झाले आहे. शहजादला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. एवढ्या वयात हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे कुटुंबीय आणि सर्वांनाच धक्का बसला आहे.

2 / 6

शहजाद आझम राणा हा सियालकोटचा रहिवासी होता. तसेच एक घातक वेगवान गोलंदाजीचा चेहरा म्हणून त्याला ओळखले जायचे. शहजादने पाकिस्तानमध्ये 95 प्रथम श्रेणी आणि 58 लिस्ट ए आणि 29 टी-20 सामने खेळले आहेत.

3 / 6

शहजाद आझम राणाने आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीत एकूण 496 बळी पटकावले आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 388 बळी घेतले होते. त्याचवेळी त्याने लिस्ट ए मध्ये 81 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 27 बळींची त्याच्या नावावर नोंद आहे. शहजादने पाकिस्तानच्या संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमसोबतही क्रिकेट खेळले आहे.

4 / 6

खरं तर शहजाद आझमने त्याचा शेवटचा प्रथम श्रेणीतील आणि लिस्ट ए मधील सामना 2018 मध्ये खेळला होता. लक्षणीय बाब म्हणजे त्याने त्याच्या शेवटच्या लिस्ट ए सामन्यात 5 बळी पटकावले होते. तर त्याने शेवटचा टी-20 सामना 2020 मध्ये खेळला होता.

5 / 6

इस्लामाबादकडून खेळलेल्या शहजादने 2017-18 या वर्षात आपल्या खेळीने सर्वांना आकर्षित केले होते. तसेच या वेगवान गोलंदाजाने इस्लामाबादसाठी 7 सामन्यात 26 बळी घेतले आहेत. यानंतर त्याने 2018-19 एकदिवसीय चषक स्पर्धेत इस्लामाबादसाठी सर्वाधिक बळी पटकावले होते.

6 / 6

शहजाद आझम राणाने वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे. पाकिस्तानचे अनेक दिग्गज शहजादच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त करत आहे.

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजममृत्यूहृदयविकाराचा झटका
Open in App