Join us  

PAK vs AUS 1st Test Imam Ul Haq: बापरे... ५ दिवसांत ११८७ धावा! २ दीडशतकं, २ शतकं अन् ४ अर्धशतकं!! पाकिस्तानच्या पिचवर आधी धावांचा अन् मग टीकेचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 6:18 PM

Open in App
1 / 6

Imam Ul Haq, PAK vs AUS 1st Test: पाकिस्तानच्या (Pakistan) धरतीवर बऱ्याच वर्षांनी ऑस्ट्रेलियन (Australia) संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आला. रावळपिंडीच्या मैदानावर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात ५ दिवसांच्या खेळात तब्बल १ हजार १८७ धावा केल्या गेल्या. त्यात २ दीडशतकं, २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता.

2 / 6

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानने ४ बाद ४७६ धावांवर डाव घोषित केला. या डावात इमाम उल हक आणि अजहर अली दोघांनीही झंझावाती दीडशतकं ठोकली. इमामने १५७ तर अजहरने १८५ धावा कुटल्या.

3 / 6

पाहुण्या ऑस्ट्रेलियानेही यास जोरदार प्रत्युत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४५९ धावा कुटल्या. त्यांच्याकडून कोणालाही शतक झळकावता आलं नाही. पण उस्मान ख्वाजा (९७), मार्नस लाबूशेन (९०), स्टीव्ह स्मिथ (७८) आणि डेव्हिड वॉर्नर (६८) यांनी अर्धशतकं ठोकली.

4 / 6

त्यानंतर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दुसऱ्या डावात अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद २५२ धावांची भागीदारी केली. इमान उल हकने दुसऱ्या डावातही नाबाद १११ धावा केल्या. तर अब्दुल्ला शफीकने नाबाद १३६ धावांची खेळी केली.

5 / 6

दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या इमाम उल हकला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या डावात १६ चौकार व २ षटकार लगावले. तर दुसऱ्या डावात ७ चौकार आणि २ षटकार खेचले.

6 / 6

पाकिस्तानच्या या खेळपट्टीवर फलंदाजांनी अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. पण खेळपट्टी अगदीच पाटा असल्याने नंतर जाणकारांनी त्यावरून टीकेचाही पाऊस पाडला. कसोटी क्रिकेटसाठी अशी खेळपट्टी असल्यास सामन्यातील रंजकता कमी होते, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. तर सामने अनिर्णितच होत राहिले तर प्रेक्षक कसोटी क्रिकेटकडे पुन्हा पाठ फिरवेल अशी भीतीही काहींनी व्यक्त केली.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथ
Open in App