Join us

उगीच नाही 'देव' म्हणत; सचिनचा फोटो दिसताच जॉन्टी रोड्सचा वाकून नमस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 14:10 IST

Open in App
1 / 10

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात याची प्रतिची पुन्हा एकदा आली.

2 / 10

सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ भारतच नाही, तर जगावर राज्य केलंय. आजही ९० आणि २००० च्या दशतकातील क्रिकेट चाहते सचिनचा खेळ आठवून वेगळाच आनंद व्यक्त करत असतात.

3 / 10

सचिनच्या याच खेळीला प्रेरणास्त्रोत मानून सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. सचिनने वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने सचिनला खांद्यावर घेताना म्हटले होते, आता भारतीय संघाचा भार आमच्या खांद्यावर आहे.

4 / 10

सचिनला केवळ भारतीय संघाचेच खेळाडू मानतात असं नाही, तर विदेशातील खेळाडूही सचिनचा तितकाच आदर करतात. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही यापूर्वी सचिनचं भरभरुन कौतुक केलं होतं.

5 / 10

दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर आणि डाय मारुन चेंडू अडवण्यात प्रसिद्ध असलेला जॉन्टी रोड्सने यापूर्वी मैदानावरच सचिनचे पाय धरले होते. आता, पुन्हा एकदा त्याने आपल्या कृतीतून सचिन हा क्रिकेटचा देव असल्याचं दाखवून दिलंय.

6 / 10

पालघरच्या सफाळे सारख्या ग्रामीण भागात ओमटॅक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारलं आहे.

7 / 10

दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जाँटी रोड्स याने या प्रशिक्षण केंद्रात उपस्थिती लावल्याने येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आनंदाचा धक्का बसला.

8 / 10

यावेळी स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश करताना लावण्यात आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फोटो पाहताच जॉन्टीने फोटोतील सचिनच्या पायाला स्पर्श करत वाकून नमस्कार केला.

9 / 10

जॉन्टीसमवेत या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात असलेले सर्वचजण हा आदर पाहून अवाक् झाले. तर, सचिनला क्रिकेटचा देव उगीच म्हणत नाहीत, याची प्रचितीही सर्वांना आली.

10 / 10

पालघर सारख्या ग्रामीण भागात अद्यावत अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रिकेट पीच उभारल्याने जोंटी रोड्स यानेही या इन्स्टिट्यूटचे कौतुक केले. यावेळी, येथील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनपर टीप्सही दिल्या.

टॅग्स :सचिन तेंडुलकरद. आफ्रिकापालघरभारतीय क्रिकेट संघ