मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला.
शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
लंकेने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १७.३ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १९ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले.
शार्दुल ठाकूरने कारकिर्दीतील सर्वोत्तम मारा करताना २७ धावांत ४ बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले.