भारत आणि दुबई हे खास कनेक्शन आहे. सोन्याची तस्करी दुबईहून होते, मोठमोठे गुंडही दुबईला पळालेले आहेत. भारतासाठी दुबई बदनाम असली तरी भारतीय संघासाठी दुबई लकी ठरत आहे. यामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीचे भारताचे सर्व सामने दुबईतच झाल्याने भारताला त्याचा फायदा मिळाल्याचा आरोप होत आहे. परंतू, कनेक्शन पाहिले तर नेहमीच दुबई भारतासाठी फायद्याची ठरली आहे.
चॅम्पिअन्स ट्रॉफी आयोजनाचा हक्क तर पाकिस्तानचा आहे, परंतू या स्पर्धेवर भारताचे राज्य आहे. कारण एकट्या भारतीय संघासाठी सर्व संघांना अगदी पाकिस्तानलाही दुबईला जावे लागले होते.
आता तर फायनलही कुठे होणार हे भारताने फिक्स करून टाकले आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळविले गेलेले सर्व सामने भारताने जिंकले आहेत. हे विजय विरोधकांना पहावत नाहीएत. यामुळे हे लोक भारतीय संघाला दुबईतच खेळल्याचा फायदा झाल्याचे म्हणत आहेत.
आकडे पाहिले तर यंदाची चॅम्पिअन्स ट्रॉफी भारतच जिंकण्याचे संयोग जुळत आहेत. कारण दुबईत भारतीय संघाचे आजवर १० सामने झाले, त्यापैकी ९ सामन्यांमध्ये भारताने विजय प्राप्त केलेला आहे. तर एकच सामना जो ड्रॉ ठरला आहे.
म्हणजेच भारतीय संघाला १०० टक्के विजय मिळालेला आहे. यामुळे फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका येऊद्या की न्यूझीलंड भारतीय संघच जिंकणार असल्याचा विश्वास चाहत्यांना वाटत आहे.
भारतीय संघ या मैदानाचा फायदा घेत असल्याचे आरोप होत आहेत. परंतू, भारतीय संघाने ना या मैदानावर सराव सत्र आयोजित केले होते ना रोज इथे सराव केला जात आहे.
गंभीरनुसार भारतीय संघ आईसीसी अकादमीमध्ये सराव करत आहे. तेथील परिस्थिती आणि मैदानावरील परिस्थितीत १८० अंशाचा बदल आहे.
जर भारतीय संघ दोन-ती स्पीनरना १५ खेळाडूंमध्ये निवडत असेल तर ती मॅच पाकिस्तानात होऊदे की दुबईत आम्ही त्यांनाच संघात स्थान देणार, कारण ही स्पर्धा भारतीय उपखंडात होत आहे, असे गंभीरने म्हटले आहे.
तसेच हे मैदान आमच्यासाठी एवढे तटस्थ आहे जेवढे ते इतर संघांसाठी आहे. आम्हाला आठवत नाहीय की आम्ही या मैदानावर यापूर्वी कधी खेळलो होतो, असे गंभीरने या आरोपांवर स्पष्ट केले आहे.