Join us  

PHOTOS : क्रिकेटमध्ये 'लग्न'मालिका! सात दिवसांत पाच खेळाडू चढले बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 5:15 PM

Open in App
1 / 10

वन डे विश्वचषक २०२३ नंतर द्विपक्षीय मालिका सुरू झाल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिका पार पडली. तर पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका होत आहे. एकिकडे क्रिकेटचा थरार अन् दुसरीकडे क्रिकेट विश्वात 'लग्न' मालिका, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

2 / 10

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज नवदीप सैनी २३ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकला. खरं तर सैनीने गुपचूप लग्न करून सर्वांनाच सरप्राईज दिले.

3 / 10

त्याने लग्नाचे फोटो शेअर करताना म्हटले, 'अस्थाना, तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाने भरलेला दिवस आहे. आज आम्ही कायमचे एकमेकांचे झालो आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत.'

4 / 10

नवदीपने मैत्रीण स्वाती अस्थानासोबत सातफेरे घेतले. स्वाती एक फॅशन, ट्रॅव्हलर आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे. तिचे यूट्यूब चॅनेल देखील आहे.

5 / 10

भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याची मैत्रीण दिव्या सिंहसोबत २८ नोव्हेंबरला लग्न केले. मुकेश कुमार आणि दिव्या एकमेकांना आधीच ओळखतात. दिव्या सिंह एका सामान्य कुटुंबातून येते.

6 / 10

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक २५ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. त्याने त्याची प्रेयसी अनमोल महमूदसोबत विवाहगाठ बांधली.

7 / 10

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस गीन २४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकला. लग्नाचे फोटो ख्रिसची पत्नी बेल्स वेग्सचॉसलने शेअर केले.

8 / 10

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू गेराल्डनेही नव्या आयुष्याची सुरूवात केली, त्याने त्याची मैत्रीण हानाशी लग्न केले. गेराल्डने त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत आणि देवाचे आभारही मानले आहेत.

9 / 10

वर्ल्ड कपच्या या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल पाच खेळाडूंमध्ये तो होता. गेराल्डने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना त्याने कथेवर लिहिले, 'Incredibly, Thank God.'

10 / 10

चमकदार कामगिरी केल्यानंतर आणि आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केल्यानंतर, गेराल्ड आयपीएलमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटलग्नऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ