मुंबई इंडियन्सचा खेळाडू तरुणीला लाँग ड्राईव्हर घेऊन गेला अन् रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून केलं प्रपोज

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची लव्ह स्टोरी... याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेल यानेही प्रेमासाठी मोठं धाडसं केलं होतं.

पार्थिव पटेलचा जन्म ९ मार्च १९८५ रोजी अहमदाबाद येथे झाला. या डावखुऱ्या फलंदाजाचे पूर्ण नाव पार्थिव अजय पटेल आहे. पार्थिवने पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ मार्च २००२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला.

५ फूट ४ इंच उंचीचा पार्थिव त्याच्या मित्रांमध्ये 'बच्चा' नावाने प्रसिद्ध आहे. पण, प्रेमासाठी तो सर्वांवर भारी पडला होता.

यष्टिरक्षक पार्थिवने प्रथम श्रेणी सामन्यातही गोलंदाजी केली, हे खूप कमी जणांना माहित्येय. त्याने ९१ चेंडूत ४.२१ च्या इकॉनॉमीसह ६४ धावा दिल्या होत्या.

पार्थिव पटेलने भारतासाठी ५ कसोटी सामन्यांमध्ये सलामी दिली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाने चारमध्ये विजय मिळवला आहे. पार्थिवने कर्णधार म्हणून २०१६-१७ मध्ये गुजरातला रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती.

पार्थिव पटेलने २५ कसोटी सामन्यांच्या ३८ डावांमध्ये ९३४ धावा केल्या आहेत आणि त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ३८ वन डे सामन्यांत ७३६ धावा केल्या आहेत.

पार्थिवने दोन ट्वेंटी-२० मध्ये ३६ धावा केल्या आहेत. पार्थिवने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २०९ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत. याशिवाय त्याने यष्टिरक्षक म्हणून ९३ झेल आणि १९ स्टंपिंग केले आहेत.

पार्थिवने २००८ मध्ये बालपणीची मैत्रीण अवनी झवेरीशी लग्न केले. पार्थिव एकदा अवनीला लाँग ड्राईव्हवर घेऊन गेला, जिथे त्याने तिला रस्त्याच्या मधोमध फुलं देऊन प्रपोज केले.

९ मार्च २००८ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी पार्थिवने अवनीसोबत लग्नं केलं. या जोडप्याला वनिका नावाची मुलगी आहे. पार्थिव त्याच्या मुलीला स्वतःसाठी खूप भाग्यवान समजतो.