Join us  

सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:24 AM

Open in App
1 / 7

भारत-इंग्लंड यांच्यातल्या ( India vs England, T20I Series) दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि इशान किशन ( Ishan Kishan) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शिखर धवन आणि अक्षर पटेल यांच्या जागी या दोघांना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ( Narendra Modi Cricket Stadium) दुसऱ्या सामन्यात अंतिम ११मध्ये स्थान मिळालं.

2 / 7

या सामन्यात इशान किशननं सलामीला येताना ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ५६ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळाली नाही. इशान व सूर्यकुमार यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानं इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांची डोकेदुखी वाढवली आहे.

3 / 7

BCCI २०२२मध्ये दहा संघांसह आयपीएल खेळवण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी येत्या मे महिन्यात मेगा ऑक्शन होणार असून दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघांना त्यांच्या रिटेन ( कायम राहणाऱ्या) व रिलीज ( करारमुक्त केलेले) केलेल्या खेळाडूंची यादी BCCIकडे सोपवावी लागणार आहे.

4 / 7

पण, आता मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करता येणार नाही. त्यामुळे २०२२च्या आयपीएलमध्ये ही दोघं मुंबई इंडियन्सकडूनच खेळतील याची शक्यता फार कमी आहे.

5 / 7

BCCIच्या नियमानुसार प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी फक्त तीन खेळाडूंनाच रिटेन करू शकते, परंतु राईट टू मॅच ( RTM) नियमानुसार एक परदेशी आणि एका अनकॅप ( राष्ट्रीय संघात पदार्पण न केलेला खेळाडू) यांना कायम राखता येऊ शकते. अशा परिस्थितीत MI फक्त रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या या तीन कॅप खेळाडूंना संघात कायम ( Retain) ठेवतील, परंतु त्यांना सूर्यकुमार व इशान यांना रिलीज करावे लागेल.

6 / 7

२०२१साठीचा मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) संघ - रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग

7 / 7

IPL 2021 Auctionमध्ये खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसूर्यकुमार अशोक यादवइशान किशनमुंबई इंडियन्सआयपीएल