IPL २०२६ च्या लिलावात मुंबई इंडियन्सचा संघाच्या पर्समध्ये २.७५ कोटी रुपये एवढी कमी रक्कम शिल्लक आहे. मिनी लिलावात मोठा डाव खेळण्याऐवजी ते स्वस्तात मस्त शॉपिंग करण्यावर भर देतील.
पंजाबचा संघ पर्समध्ये ११.५० कोटी रुपये घेऊन खेळाडूंवर बोली लावायला मिनी लिलावात उतरले. त्यांनी मिनी लिलावाआधीच तगडी संघ बांधणी केली असून या रक्कमेसह ते योग्य वेळी योग्य खेळाडूवर डाव खेळताना दिसतील.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाच्या पर्समध्ये १२.८० कोटी रुपये आहेत. त्यामुळे या संघातही फार मोठा बदल अपेक्षित नाही.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने मिनी लिलावाआधी ट्रेड विंडोच्या माध्यमातून मनासारखा डाव खेळला आहे. ते मिनी लिलावासाठी त्यांच्या पर्समध्ये १६.०५ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.
गत आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघाच्या पर्समध्ये मिनी लिलावासाठी १६.४० कोटी रुपये शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये २१.८० कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे. तेही एखादा मोठा डाव अगदी सहज खेळताना दिसतील.
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने ट्रेड विंडोच्या माध्यमातून मोहम्मद शमीला आपल्या संघात घेतल्याचे पाहायला मिळाले. मिनी लिलावा खेळाडूंवर बोली लावण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये २२.९५ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.
काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडे मिनी लिलावात बोली लावण्यासाठी पर्समध्ये २५.५० कोटी एवढी रक्कम आहे. हा संघही एखादा मोठा डाव खेळताना दिसून शकेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पर्समध्ये ४३.४० कोटी एवढी तगडी रक्कम आहे. लिलावात मोठी बोली लावण्यात फारसा रस न दाखवणारा संघ मोठ्या रक्कमेसह उतरून काय चाल खेळणार ते पाहण्याजोगे असेल.
शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ IPL 2026 च्या मिनी लिलावासाठी सर्वाधिक पैसा पर्समध्ये बाळगून आहे. हा संघ मिनी लिलावात मोठा धमाका करू शकतो.