Mumbai Indians ची सुंदर 'मॅचविनर' ! अमेलियाने WPLमध्ये काढली भल्याभल्यांची 'विकेट'

Amelia Kerr Mumbai Indians Winner WPL 2025: मैदानात फिरकीने अन् मैदानाबाहेर सौंदर्याने 'विकेट' काढणारी मुंबई इंडियन्सची 'जादुगार'

न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने नुकत्याच झालेल्या वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सला जिंकवण्यात मोठा हातभार लावला.

महिलांची फ्रँचायझी टी२० स्पर्धा WPLच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभूत केले आणि दुसरे विजेतेपद जिंकले.

मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण हंगामात टीमची सुंदर मॅचविनर अमेलिया केर हिने धडाकेबाज कामगिरी केली आणि सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली.

अमेलियाने यंदाच्या हंगामात १० सामन्यात ३७ षटके टाकली आणि १८ विकेट्स घेतल्या. ३८ धावांत ५ बळी ही तिची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

अमेलिया सौंदर्यवती तर आहेच पण ती उत्तम क्रिकेटपटू म्हणूनही लोकप्रिय आहे. तिला नुकताच सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू २०२४ हा पुरस्कार मिळाला.

T20 वर्ल्डकप २०२४ मधील अष्टपैलू कामगिरीमुळेच अमेलियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीची महिला क्रिकेटपटू म्हणून ओळख मिळाली.

अमेलिया अचानक क्रिकेटर झालेली नाही. तिच्या कुटुंबात आधीही क्रिकेटपटू होऊन गेलेत. तिचे आजोबा ब्रुस मरे हे न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळले होते.

तिची बहीण जेस केर हिनेही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. आता अमेलियादेखील अप्रतिम कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे.