आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा झहीर खानच्या नावे आहे. आपल्या कारकिर्दीतील ३०३ सामन्यात तो ४३ वेळा खाते उघडण्यात अपयशी ठरल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत ईशांत शर्माच्या नावाचाही समावेश आहे. १९९ सामन्यात तो ४० वेळा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
या यादीत विराट कोहली टॉप ३ मध्येच नव्हे तर टॉप ५ मध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. रमनशिन विराट कोहलीवर ५५१ सामन्यात ३९ वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे.
माजी फिरकीपटू हरभजन सिंग आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३७ वेळा खाते न उघडता तंबूत परतला आहे.
जसप्रीत बुमराह आतापर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५ वेळा शून्यावर बाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.
माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५ वेळा खाते उघडण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.
रोहित शर्मा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० सामन्यात ३४ वेळा शून्यावर तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आपल्या मोठ्या कारकिर्दीत ३४ वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे.