Join us

Mohammad Rizwan चा विकेटमागे 'सिक्सर'; वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 21:08 IST

Open in App
1 / 8

पाकिस्तान संघाचा कॅप्टन आणि विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवान याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खास विक्रमाची नोंद केलीये.

2 / 8

मोहम्मद रिझवान याने परदेशी मैदानात खेळताना एका वनडे सामन्यात विकेटमागे सर्वाधिक कॅच घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एन्ट्री मारली आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे.

3 / 8

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद रिझवान याने विकेटमागे ६ कॅच घेत वर्ल्ड विक्रमाशी बरोबरी केली.

4 / 8

ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्ट याने तीन वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. २००० मध्ये दक्षिण आफ्रिका, २००४ मध्ये श्रीलंका आणि २००७ मध्ये भारतीय मैदानात त्याने विकेटमागे ६ झेल टिपल्याचे पाहायला मिळाले होते.

5 / 8

या यादीत पाकिस्तानचा माजी विकेट किपर सरफराज अहमदचाही समावेश आहे. २०१५ मध्ये ऑकलंडच्या मैदानात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ झेल टिपले होते.

6 / 8

दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचरनं २००७ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यात विकेट मागे ६ कॅच पकडण्याचा पराक्रम नोंदवला होता.

7 / 8

इंग्लंडच्या जोस बटलरनं २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विकेटमागे ६ कॅच पकडले होते.

8 / 8

विकेट मागे सर्वाधिक ६ कॅट घेणाऱ्या अन्य विकेटकिपरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक विरुद्ध अफगाणिस्तान २०२३, स्कॉटलंडचा मॅट क्रॉस विरुद्ध कॅनडा २०१४, इंग्लंडचा ॲलेक स्टुअर्ट विरुद्ध झिम्बाब्वे २००० दक्षिण आफ्रिकेचा मॅट प्रायर विरुद्ध इंग्लंड २००८ या खेळाडूंचाही समावेश आहे.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया