Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत हॉट अंदाज; MI ची ‘बोल्ड’ बोलंदाजीही चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 06:55 IST

Open in App
1 / 8

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू विल जॅक्स याने नव्या वर्षांत आयुष्यातील नव्या चॅप्टरची सुरुवात केली आहे.

2 / 8

विल जॅक्सनं लाँग टाइम गर्लफ्रेंड आना ब्रमवेल हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे.

3 / 8

दोघांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील खास क्षणाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

4 / 8

इंग्लंड क्रिकेटरनं प्रेमाच्या खास अध्याय सुरु केल्याची गोष्ट शेअर करताना गर्लफ्रेंडसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

5 / 8

या फोटोमध्ये विल जॅक्सची गर्लफ्रेंड आणि पार्टनर आना इंगेजमेंट रिंग दाखवत साखरपुडा उरकल्याची घोषणा करताना दिसते.

6 / 8

एका फोटोमध्ये हे कपल रोमँटिंग अंदाजात एकमेकांना किस करतानाही पाहायला मिळते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

7 / 8

याशिवाय मुंबई इंडियन्सने केलेली खास कॅप्शनसह शेअर केलेली पोस्टही लक्षवेधी ठरत आहे. इंग्लंडचा स्टार क्रिकेटर IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या जोडीला शुभेच्छा देताना MI नं 'बोल्ड ओव्हर विथ बेस्ट वे' या खास कॅप्शनसह आनानं तुला 'बोल्ड' केलं, पण आयुष्यातील प्रेमाच्या खेळपट्टीवरील 'बोल्ड' चांगला आहे, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

8 / 8

या जोडीवर क्रिकेट चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. IPL आधी साखरपुडा उरकल्यावर ही जोडी विवाह बंधनात कधी अडकणार याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.

टॅग्स :ऑफ द फिल्डमुंबई इंडियन्सइंग्लंडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट