आयपीएलच्या यंदाच्या हंगामा आधी काही संघांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यासह इथं नजर टाकुयात सुरुवातीच्या सामन्याला मुकणाऱ्या स्टार खेळाडूंबद्दल
हार्दिक पांड्यावर गत हंगामात स्लो ओव्हर रेट प्रकरणात एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असला तरी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सलामी लढतीत तो दिसणार नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीने यंदाच्या हंगामाची आपली सुरुवात करणार आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून संघाबाहेर पडलेला जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या टप्प्यातील काही सामने खेळताना दिसणार नाही. त्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबई इंडियन्स काय डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल.
लखनौ सुपर जाएंट्सला मयंक यादवच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज पहिल्या टप्प्यातील सामन्याला मुकणार आहे
लखनौच्या ताफ्यातील मिचेल मार्श हा देखील पाठीच्या दुखापतीनं त्रस्त आहे. तोही सुरुवातीच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.
ऑस्ट्रेलियन स्टार जोश हेजलवूडला आरसीबीनं आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण तोही दुखापतीचा सामना करत आहे. सुरुवातीच्या सामन्यात RCB च्या संघाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागेल.