विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सध्या क्रिकेट-बॉलिवूडमधली सर्वात फेमस जोडी. 2017मध्ये विराट-अनुष्का यांनी विवाह केला. पण, अनुष्का शर्मापूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराचं नाव ब्राझीलियन मॉडलसोबत जोडलं गेलं होतं.
अऩुष्कापूर्वी विराटच्या आयुष्यात चार महिला आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु ब्राझीलियन मॉडलसोबत विराटचं दोन वर्ष अफेअर होतं.
इजाबेला लिटे असं तिचं नवा असून विराट अन् तिची पहिली भेट ही एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान झाली होती.
सिंगापूरमध्ये दोघांची पहिली भेट झाली आणि तेव्हा त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यावेळी विराट टीम इंडियाचा सदस्य होता, परंतु तो एवढा फेमस नव्हता.
बॉलिवूडमधील पदार्पणापूर्वीच इजाबेला विराटसोबत डेटवर जाऊ लागली होती. सिंगापूरमध्ये एकदा विराट आणि इजाबेला शॉपिंग करताना पाहिले गेले होते आणि तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या फार चर्चा रंगल्या.
2012मध्ये इजाबेला आमीर खानच्या 'तलाश'या चित्रपटात दिसली होती.
2014मध्ये एका मुलाखतीत तिनं विराटसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तिनं सांगितलं होतं की,''दोन वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर सहमतीनं हे नातं संपवलही. पण आमची मैत्री कायम आहे.''
बॉलिवूडनंतर इजाबेला दाक्षिणात्य सिनेमात काम करत आहे. आता तिचं नाव दाक्षिणात्य हिरो विजय देवरकोंडासोबत जोडलं जात आहे.
त्याशिवाय 36 वर्षीय साराह जेन डायस हिच्यासोबतची विराटचं नाव जोडलं गेलं होतं. पण, त्या केवळ अफवा होत्या.
तमन्ना भाटिया आणि विराट यांनी 2012मध्ये एकत्र जाहीरात केली होती. तेव्हाही त्यांच्या नावाच्या अफवा होत्या.
दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी आणि विराट कोहली हे नावं चर्चे होते. ही दोघं अनेकदा सोबत दिसल्यामुळे या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, विराट सोबत मैत्रीपलिकडे काही नाही, असे संजनानं स्पष्ट केलं.