Join us  

Marriage: या भारतीय क्रिकेटपटूंनी केली आहेत दोन लग्नं, या यादीत काही दिग्गजांचाही आहे समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 12:50 PM

Open in App
1 / 7

क्रिकेट भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही फॅन्समध्ये चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा सहा भारतीय क्रिकेटपटूंबाबत माहिती देणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दोन विवाह केले आहेत.

2 / 7

या यादीत पहिलं नाव आहे ते माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक अरुण लाल यांचं. अरुण लाल यांनी हल्लीच बुलबुल साहा यांच्याशी विवाह केला होता. अरुण लाल हे ६६ वर्षांचे तर बुलबुल ३८ वर्षांच्या आहेत. तत्पूर्वी अरुण लाल यांनी रीना यांच्याशी विवाह केला होता.

3 / 7

भारतीय संघात तीन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकने २ विवाह केले होते. दिनेश कार्तिकचा पहिला विवाह निकिता वंजारा हिच्याशी २००७ मध्ये झाला होता. मात्र लग्नानंतर पाच वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकने २०१५ मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

4 / 7

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यानेही दोन विवाह केले आहेत. त्याचा पहिला विवाह १९९९ मध्ये ज्योत्स्ना हिच्याशी झाला होता. मात्र नंतर दोघांनीही परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर २००८ मध्ये पत्रकार माधवी पत्रावली हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

5 / 7

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानेही दोन लग्नं केली आहेत. त्याने १९८७ मध्ये नौरिन हिच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर १९९६ मध्ये त्याने नौरिनला घटस्फोट देत अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याशी विवाह केला. मात्र २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

6 / 7

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी यानेही दोन लग्नं केली आहेत. विनोद कांबळीने पहिलं लग्न हे नोएला लुईस हिच्याशी केलं होतं. मात्र ते फार काळ टिकलं नाही. त्यानंतर विनोद कांबळीने आंद्रिया हेविट हिच्याशी लग्न केलं. हेविट एक मॉडेल आहे.

7 / 7

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनीही दोन लग्नं केली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव शबनम सिंह आहे. ती युवराज सिंहची आई आहे. त्यानंतर त्याने सतवीर कौर हिच्याशी विवाह केला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघलग्नदिनेश कार्तिकविनोद कांबळी
Open in App